माहितीचा अधिकार (RTI)
ग्रामपंचायत काझीखेड, ता. बाळापूर
प्रशासनात पारदर्शकता आणि ग्रामस्थांचे सक्षमीकरण
कु. टी. एन. मात्रे
जनमाहिती अधिकारी (ग्रामसेवक)ग्रामपंचायत कार्यालय, काझीखेड
संपर्क: कार्यालयाशी संपर्क साधा
kazikhed.gp@email.com
वेळ: स. १०:३० ते सा. ५:३०
मा. गटविकास अधिकारी सो.
प्रथम अपिलीय अधिकारीपंचायत समिती, बाळापूर
जिल्हा अकोला, महाराष्ट्र
कार्यालयीन दूरध्वनी उपलब्ध
अपील कालावधी: ३० दिवस
कायद्याची ठळक वैशिष्ट्ये
- कोणताही नागरिक ग्रामपंचायतीच्या कामाचा लेखी तपशील मागवू शकतो.
- अर्ज केल्यापासून ३० दिवसांच्या आत माहिती मिळणे अनिवार्य आहे.
- माहिती नाकारल्यास किंवा असमाधानकारक असल्यास अपिलीय अधिकाऱ्याकडे दाद मागता येते.
- शुल्क: अर्जासोबत विहित केलेले कोर्ट फी स्टॅम्प किंवा रोख पावती आवश्यक.
अर्ज करण्याची पद्धत
- कोऱ्या कागदावर किंवा नमुना ‘अ’ मध्ये स्पष्ट अक्षरात अर्ज लिहावा.
- अर्जात नेमकी कोणती माहिती हवी आहे, याचा स्पष्ट उल्लेख करावा.
- दारिद्र्य रेषेखालील (BPL) नागरिकांना शुल्क माफ आहे (पुरावा आवश्यक).
- अर्ज प्रत्यक्ष कार्यालयात देऊन पोच पावती घ्यावी किंवा रजिस्टर पोस्टाने पाठवावा.
📊 माहिती अधिकार अहवाल स्थिती
| आर्थिक वर्ष | प्राप्त अर्ज | निकाली काढलेले | प्रलंबित | अहवाल स्थिती |
|---|---|---|---|---|
| २०२५-२६ | — | — | — | प्रक्रियेत |
| २०२४-२५ | अद्यावत | सर्व | ०० | पूर्ण |

